यावल येथे स्वच्छता अभियान जनजागृतीसाठी दवंडी

yawal

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अनेक गावी ही खऱ्या अर्थाने हगणदारी मुक्त व्हावी या सामाजिक दृष्टीकोणातुन याकरिता आता ग्रामीण क्षेत्रातील गावपातळीवर ग्रामपंचायत, ग्रामपातळीवरील सामाजिक कार्यकर्ते आणी स्वच्छता मोहीम राबविणाऱ्या प्रशासनाबरोबर येथील पो.नि. अरूण धनवडे यांनी शासनास पुर्ण सहकार्य करण्याचा विडा उचलला असुन त्यांच्या या निर्णयाचे ग्रामस्थ बांधवांकडुन स्वागत देखील करण्यात येत आहे.

तालुक्यातील अनेक गावे शासन दरबारी निव्वळ कागदोपत्री हगंणदारी मुक्त असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्ष गावात प्रवेश करतांना स्थतीमध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही. त्यामुळे शासनाकडुन राबविण्यात येत असलेली स्वच्छता मोहीम ही देखावा म्हणुन फक्त पुरस्कार मिळाला की झाले याच हेतू राबवण्यात येत असल्याची ओरड नेहमीच होत असते या सर्व बाबीचा विचार करता येथील पो.नि.अरूण धनवडे यांच्या लक्षात आले. दररोज सकाळी यावल वरून मॉर्निंग वॉकला जाताना त्यांनी परीस्थीती पाहील्यांनतर त्यांनी शासनास सहाकर्य करण्याचे ठरविले. गुरूवारी सकाळी त्यांनी तालुक्यातील बोराळे येथे जावून ग्रामसंसोबत चर्च करून सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्याची ग्रामस्थांना विंनती केली. त्याचबरोबर त्यांनी स्वत:समक्ष गावात दवंडी देण्यास सुचविले. ग्रामस्थांनी शौचालयाचा वापर न केल्यास विर्दुपीकरण का्र्याअंतर्गत उघडयावर शौचविधी करणा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

Protected Content