यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील ईद ए मिलाद उल नबीच्या निमित्ताने शहरातील पीस एज्युकेशनल अॅन्ड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास सर्वधर्मीय नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. संपुर्ण जगाला प्रेम सदभावना व सामाजीक सलोख्याचे संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने यावल शहरातील पीस एज्युकेशनल अॅन्ड वेल्फेअर सोसायटी या सामाजीक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचे उदघाटन डॉ उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ईकरा सोसायटी जळगावचे अध्यक्ष अ .करीम सालार हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील , माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते ,धनंजय शिरीष चौधरी , भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , माजी नगरसेवक असलम शेख नबी, समीर मोमीन, सैय्यद युनुस सैय्यद युसुफ , काँग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, माजी नगरसेवक तुकाराम बारी , पुंडलीक बारी यांच्या मोठया संख्येत विविध संस्थांचे मान्यवर पदाधिकारी या शिबिरास प्रामुख्याने उपस्थित होते. रक्तदान शिबीराची सुरूवात मौलाना खलील अहमद आलीमे दिन यांनी दिलेल्या रक्तदानाने करण्यात आली. या शिबीरात ५२ तरूणांनी रक्तदान केलीत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कदीर खान यांनी सहकार्य केले.