यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने कर्नाटक राज्यात झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रीक निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाल्याने भाजपाच्या हातातुन सत्ता ओढुन आणल्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.
कर्नाटक राज्यात भाजपाला मोठा पराभव स्विकारावला लागला. जातीवाद, महागाई, बेरोजगारी या विषयाला कंटाळुन कर्नाटकाच्या जनतेने भाजपाला सत्तेबाहेर काढल्याने या ठिकाणी काँग्रेसच्या सत्तेचे द्वार उघडले आहे. कर्नाटक राज्यात कॉंग्रेस पक्षाने मिळवलेल्या दणदणीत विजयाचा आनंद आज सायंकाळी शहरातील बुरूज चौकात फटाक्यांची आतिषबाजी व मिठाई वाटुन जल्लोष साजरा केला यावेळी यावल तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष अस्लम शेख नबी, माजी नगरसेवक गुलाम रसुल, काँग्रेसचे प्रटेश जलील पटेल, युवक काँग्रेसचे रावेर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष फैजान शाह, शहर अध्यक्ष कदीर खान, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, आदीवासी सेलचे बशीर तडवी, नईम शेख , सकलेन खान , हाजी अय्याज खान यांच्यासह मोठया संख्येत पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.