भुसावळच्या हद्दवाढीसाठी नव्याने प्रस्ताव पाठविणार

भुसावळ प्रतिनिधी । शहराच्या हद्दवाढीसाठी शासनाने सूचित केल्यानुसार नव्याने प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय आज झालेल्या नगरपालिकेच्या सभेत घेण्यात आला.

शहराच्या हद्दवाढीबाबत चर्चा करण्यासाठी आज दुपारी नगरपालिकेची विशेष सभा घेण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मीताई मकासरे आणि मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर हे उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या नगरपालिकेच्या सभेकडे जनआधार आघाडीच्या नगरसेवकांनी पाठ फिरवली होती. मात्र आजच्या सभेत या आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते. या सभेत हद्दवाढीबाबत चर्चा करण्यात आली.

भुसावळ नगरपालिकेने हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाला १५ फेब्रुवारी रोजी पाठविला होता. यावर शासनाने नगरपालिकेला नवीन प्रस्ताव पाठविण्याचे सूचित केले आहे. यावर या सभेत चर्चा करण्यात येऊन हद्दवाढीचा प्रस्ताव नव्याने पाठविण्यास संमती देण्यात आली. याच्या अंतर्गत शहराला लागून असणार्‍या मात्र ग्रामीण हद्दीत असणारा भाग हा नगरपालिकेला जोडण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव नगरपालिका आता राज्य शासनाकडे पाठविणार आहे. हा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

Add Comment

Protected Content