यावल येथे आदीवासी बांधवांना विविध दाखल्याचे वाटप

parola

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत वास्तव्यास असलेल्या आदीवासी बांधवांसाठी महाराजस्व अभियानांतर्गत आवश्यक दाखले महसुली दाखले व शासनाच्या वतीने विविध विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्‍या योजनांचा लाभ तालुका प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील आदिवासी बांधवाना देण्यासाठी अतीदुर्गम भागातील लंगडाआंबा या ठीकाणी वितरणाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

चोपडा विधान सभेच्या मतदार संघातील आ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते दाखल्यांचे व विविध योजनाच्या लाभाचे आदिवासींना वितरण करण्यात आले. कार्यक्रमात सुमारे ८०० विविध महसुली दाखल्योच वितरण करण्यात आले. प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर यांचेसह विविध शासकीय यंत्रणेचे अधिकारी व विविध विभागाचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थीत होते.

महसुल प्रशासना च्या या महाराजस्व अभियानांअतर्गत तालुक्यातील अतीदुर्गम भागातील गाड-या, जामन्या, उसमळी व लंगडा आंबा या गावातील आदिवासींना सुमारे १०० किमी अंतरावर यावल येवून शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे प्रशासनाच्या वतीने लंगडाआंबा येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवून कार्यकमात आदीवासी बांधवांना जातीचे ६७५, रहीवास व राष्ट्रीयत्वाचे ५१, वैयक्तीक वनदावे हक्काचे प्रमाणेपत्रे १९ सामुहीक वनदावे हक्क प्रमाणपत्रे ४ असे विविध दाखल्यासह १०० शिधापत्रिका आमदार सौ .लताताई सोनवणे यांचे हस्ते वितरण करण्यात आलीत.

याप्रसंगी कृषी विभागाच्या वतीने आदिवासींना बि-बियाणचे वाटप करण्यात आले तर आयोग्य विभागाच्या वतीने आजााचे निदान करून औषधींचे वाटप करण्यात आले. प्रसंगी पंचायत समिती चे गटनेते शेखर सोपात पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील, शिवसेनेचे यावल तालुका प्रमुख रवि सोनवणे, येथील सहाय्यक गटविकास अधिकारी लुकमान आय. तडवी , तालुका कृषी अधिकारी जाधव, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्‍हाटे यांचेसह विविध शासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.

Protected Content