पारोळा येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

parola news

पारोळा प्रतिनिधी । शहरातील मडक्या मारुती परीसरात राहणाऱ्या शेतकऱ्याने शेतात विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी पारोळा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, हिरामण बाबुराव बारी (वय-७०) यांनी वंजारी खु भागात असलेली शेतीत मका व गहू पेरणी केली होती. ते नेहेमीप्रमाणे शुक्रवार ७ रोजी दुपारी ४ वाजता शेतात गेले. सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी न आल्याने त्यांचा लहान मुलगा देविदास हा वडील शेतातून का आले नाही. म्हणून तो त्यांना पाहण्यासाठी शेतात गेला तर वडील शेतात असलेल्या घराच्या ओट्यावर पडले दिसले. त्यांच्या नाका तोंडातून फेस येत होता. त्यांना रिक्षाने उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णल्यात आणले. वैद्यकिय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे यांनी शर्थीचे प्रयन्त केले. पण उपचार दरमान्य त्यांचा मृत्यू झाला.

हिरामण बारी हे गेल्या अनेक दिवसांपासून वैफल्य ग्रस्त अवस्थेत होते. यावर्षी हाताचा सर्व हंगाम गेल्या निराशा आली होती. त्यांच्यावर हात उसनवारीचे ७८ हजार खाजगी बँकेचे व विकासोचे ७५ हजार असे कर्ज होते. या कर्जबाजारीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. पारोळा पोलीस ठाण्यात सुनील बारी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ बापूराव पाटील हे करीत आहे.

Protected Content