यावल येथील संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी पाटील, अली आणि सोनवणे यांची निवड

यावल प्रतिनिधी । यावल येथे संजय गांधी निराधार समिती सदस्यांची नुकतीच निवड करण्यात आली. यात सदस्यपदी सैय्यद जावेद अली महमंद, तुषार पाटील आणि  संदीप सोनवणे यांची निवड करण्यात आली.

ही निवड पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिफारसीने व जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली आहे. यात  अध्यक्षपदी शेखर पाटील यांची निवड झाली आहे. तर सदस्य म्हणुन मारूळ येथील सैय्यद जावेद अली व वढोदे येथील संदीप सोनवणे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे आमदार शिरिष चौधरी, काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे , शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे, काँग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, शिवसेना यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, शरद कोळी , संतोष खर्चे, दहिगावचे सरपंच अजय भालेराव , काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जलील पटेल, कॉंग्रेस आदीवासी सेलचे तालुका अध्यक्ष बशीर तडवी , अभय महाजन , विक्की पाटील , धिरज कुरकुरे , रमेश पाटील , हाजी गफ्फार शाह, मारूळचे जिया सर यांनी स्वागत केले आहे .

Protected Content