यावल प्रतिनिधी । शहरातील सराफा व्यापाऱ्याच्या पत्नी आपला वाढदिवस साजरा न करता कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रूपयांचा निधी दिला आहे. तहसीलदार यांच्याकडे धनादेश सोपविला.
संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्य सध्या कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून या संकटसमयी अनेक दानसुरांचे हात मदतीला सरसावत आहे. यावल येथील सराफा व्यापारी अभय अरविंद देवरे यांच्या पत्नी पुनम अभय देवरे यांचा आज वाढदिवस होता. परंतु देशात व राज्यात विषाणूंमुळे ओढवलेल्या आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर देवरे कुटुंबांनी आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा न करता एक लाख रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी दिले आहे. देवरे कुटुंबाने तहसीलदार जितेंद्र कुवर यांची भेट घेऊन त्यांना धनादेश सोपविला. याप्रसंगी देवरे कुटुंबातील अभय अरविंद देवरे, पुनम अभय देवरे, अर्नव देवरे यांच्यासह नगरपरिषद प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते आदी उपस्थित हेते.