पारोळा येथील बालिकेने रांगोळीतून केली कोरोनाची जनजागृती

पारोळा प्रतिनिधी । शहरातील शिंदे गल्लीतील दहावीत शिकणारी विद्यार्थीनीने रांगोळीच्या मदतीने कारोनापासून बचाव होण्यासाठी संरक्षक (छत्री) म्हणुन डॉक्टर, परीचारिका, पोलीस, सफाई कामगार व काही मिडिया कार्य करीत असुन नागरिकांनी घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे.

शहरातील शिंदे गल्ली मधील रहिवाशी गणेश नारायण क्षत्रिय यांची सुकन्या व इयत्ता १० वीची विदयार्थीनी जान्हवी उर्फ खुशी क्षत्रिय ही सुंदर रांगोळ्या काढते. तीला शेजारी राहणारे राज्य आदर्श शिक्षक मनवंतराव साळुंखे यांनी कोरोनाबाबत रांगोळीचे मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. जान्हवी इने विविध रंगांची रांगोळी वापरत जगावर पावसासारखा कोरोना विषाणुचा वर्षाव होत आहे. त्यापासुन छ्त्री म्हणजे संरक्षक म्हणुन डॉक्टर, परीचारिका, पोलीस, सफाई कामगार व काही मीडिया कार्य करीत असुन नागरिकांनी घराबाहेर पडु नका, सामाजिक अंतर राखा, मास्क वापरा, हातांना सॅनिरायझर लावा. असा संदेशही व पृथ्वी त्या रांगोळीत रेखांकित केली आहे. जान्हवीच्या या कलाकृतीचे सर्व शहरातून कौतुक होत आहे.

Protected Content