यावल प्रतिनिधी । पोलीस निरीक्षकांनी ‘टॉक विथ मॉर्निंग वॉक’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि सर्वसामान्य नागरीकांसह सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून गावपरीसरातील समस्या जाणून घेतल्या. तर त्यांना कायद्यासदर्भात माहिती देवून मार्गदर्शन केले.
यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी बुधवारी सकाळी यावल तालुक्यातील दहीगाव, सावखेडा सिम, बोराळे, नायगाव या गावातील सर्वसामान्यांशी थेट गावात १५ किलोमिटर लांब पायदळी चालत जावुन ग्रामीण नागरिकांशी सुस्वाद साधता, त्यांना गावातील उघड्यावर शौच करणे, आपल्या गावात शांतता नांदावी अशा विविध विषयासह कायद्या सुव्यवस्थेसंदर्भात सविस्तर माहिती देथुन मार्गदर्शन केले. दहीगाव येथे पत्रकार दिलीप महाजन, विजय भाऊ दहिगावचे पोलीस पाटील संतोष पाटील, रविंद्र पाटील व ग्रामस्थ यांच्याशी तर सावखेडासिम येथे यावल पं.स.सदस्य व गटनेते शेखर पाटील, सावखेडा सिमचे पोलीस पाटील पंकज बडगुजर, राजेंद्र जयकर ग्रामस्थ त्याचप्रमाणे बोराळे येथील ग्रामस्थ आणी नायगाव येथे जनतेशी संपर्क साधला. पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी तालुक्यातीत ग्रामीण जनतेशी संपर्क साधण्याच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमास मिळणाऱ्या प्रतिसादाने नागरीकांचे लक्ष वेधले आहे.