कॉंग्रेसकडे निवडणुकांसाठी लोकप्रिय नेत्याचा चेहराच नाही : कपिल सिब्बल

kapil sibbal

 

दिल्ली (वृत्तसंस्था) आमच्याकडे निवडणुकांसाठी लोकप्रिय नेत्याचा चेहराच नाही. पक्षातील हा एक कळीचा मुद्दा असल्याचे वक्तव्य वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी दिल्लीतील पराभवानंतर केले आहे.

सिब्बल म्हणाले, आमच्याकडे निवडणुकांसाठी लोकप्रिय नेत्याचा चेहराच नाही. पक्षातील हा एक कळीचा मुद्दा आहे. यामध्ये आम्ही लक्ष घालणार आहोत आणि लवकरच हा प्रश्न सोडवू. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. पवार म्हणाले होते, “दिल्लीकरांनी भाजपाला चांगलाच झटका दिला आहे. भाजपाची पराभवाची मालिका आता थांबणार नाही. सिब्बल हाच धागा पकडून पुढे म्हणाले की, धृविकारणाचा खेळ आता दिल्लीची आणि देशातील जनता चालू देणार नाही. याचे प्रतिबिंब झारखंड आणि छत्तीसगडसारख्या राज्यांमध्येही दिसून आले आहे, असेही सिब्बल म्हणाले.

Protected Content