जामनेरात ज्ञानगंगा विद्यालयातर्फे कुष्ठरोग जनजागृती रॅली

Jamner1

जामनेर प्रतिनिधी । येथील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात तालुका आरोग्य अधिकारी जामनेर यांच्यावतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय पंधरवाडा सप्ताह कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती अभियान राबविण्यात आले.

कुष्ठरोगमुक्ती व्हावी याबाबत विविध घोषणा देऊन परिसरात रॅली काढण्यात आली. त्यावेळी रॅली समारोप प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य आर.जे.सोनवणे यांनी पंडीत दीनदयाल यांचे प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना कुष्ठ रोगाच्या लक्षणाबाबत माहिती दिली. यावेळी आरोग्य अधिकारी भोकरे व नेहेते साहेब उपस्थित होते.यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content