यावल पोलीसांची नदीपात्रात झन्नामन्ना खेळणाऱ्यांवर कारवाई

 

यावल, प्रतिनिधी । येथील हडकाई नदीच्या पात्रात रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या झन्नामन्ना जुगारीच्या अड्डयावर धाड टाकुन पोलीसांनी केलेल्या कारवाईत सुमारे चार दुचाकी मोटर वाहनांसह सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल व ५२पत्ते हस्तगत केले असुन पाच जणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार गुप्त माहीती मिळाल्याच्या आधारावर गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने यावल शहरालगत असलेल्या हडकाई नदीच्या पात्रात दिनांक २० ऑक्टोबर रोजी रात्री २२ .४५ वाजेच्या सुमारास आरोपी अंकुश गोविंदा कोळी , आरोपी विजय गणेश सोनवणे , आरोपी ईसाक बिस्मिल्ला पटेल , आरोपी शरद वसंत देशमुख , आरोपी गजानन दत्तु बारी यांची घटनास्थळी अंगझडती घेतल्याने त्यांच्यांकडे चार हजार सातशे रुपये रोख मिळुन आले . पोलीसांनी त्यांच्या ताब्यातील हिरो होंडा , बजाज डिस्कव्हरी , सिडी डिलक्स , हीरो होंडा सुपर डिलक्स , अशी सुमारे एका लाख पाच हजार रूपयांची दुचाकी मोटर वाहने यावल पोलीसांनी जप्त केल्या. यावेळी काही जणांनी अंधाराचा फायदा घेवुन पळ काढला. पोलीस कर्मचारी सुशिल रामदास घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी मुंबई जुगारअॅक्ट १२ ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून , पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठान आदी पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content