अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या आठ ट्रक्टरवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या व तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्यासह पथकाने अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाईची मोहिम राबविली. कारवाईत  ८ ट्रॅक्टर जप्त करुन पोलीस ठाण्यांमध्ये लावण्यात आले आहे. 

शहरातील मोहाडी तसेच निमखेडी शिवारातून अवैध वाळूची ट्रॅक्टर जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्यासह पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे संदीप बिर्‍हाडे, प्रकाश कोकाटे, फारुख शेख, अमोल करडेकर, रविंद्र मोतीराया, प्रकाश मुंडे, प्रशांत साखरे यांच्यासह आरसीपी प्लाटूनचे दहा कर्मचारी यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास निमखेडी शिवारात तसेच मोहाडी शिवारात कारवाई केली. या दोन्ही ठिकाणच्या कारवाईत एकूण 8 ट्रॅक्टर जप्त करण्यात येवून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये लावण्यात आले.

Protected Content