यावल तालुक्यात गावठी दारू भट्टयांवर धाडी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील राजोरा व पिंप्री शिवारातील गावठी दारूभट्टयांवर धाडी टाकण्यात आल्या असून एकाला अटक करण्यात आली आहे.

सध्या लॉकडाऊनमध्ये गावठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहेत. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे आपल्या सहकार्‍यांसह पिंपरी गावात कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्थांमध्ये जनजागृतीच्या कार्यासाठी आले असता सकाळी त्यांनी तापी नदीच्या काठावर असलेल्या गावठी दारू पाडण्याच्या तीन हातभट्ट्या उध्वस्त केल्या. यात पंधराशे लिटर दारू पाण्याचे कच्चे-पक्के रसायन व ५० लिटर नमुने काढून नष्ट केली या घटनेतील सहा आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. तर दुसर्‍या घटनेत पोलिसांनी रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास तालुक्यातील राजोरा गाव शिवारात यावल चे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत गावठी दारू पाण्याचे बाराशे लिटर कच्चे-पक्के रसायन व त्याचबरोबर घटनास्थळावरून तयार केलेली पन्नास लिटर दारू नमुने काढून त्याच ठिकाणी नष्ट केली. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी सुरू केली गावठी दारू उध्वस्त करण्याच्या मोहिमेचे स्वागत होत आहे.

Protected Content