अभाविप व जी. एम. फाउंडेशनचे जामनेर तालुक्यात सेवाकार्य

जामनेर प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जामनेर व जी. एम. फाउंडेशन यांच्या वतीने ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत असून याच्या अंतर्गत वैद्यकीय मदतीसह जानजागृती करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील गावात जाऊन डॉक्टर विनामूल्य वैद्यकीय सेवा देत आहे. सोबत अभाविप कार्यकर्ते कोविड -१९ बद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहेत. वैद्यकीय सेवा देऊन आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर ग्रामस्थाना देत आहेत. अभाविप व जी.एम.फाउंडेशन वतीने मोफत मास्क वाटप करून मास्क वापरण्याचा संदेश देत आहेत. सामाजिक अंतर पाळणे, स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन शासनाच्या सुचनाचे पालन करण्याचे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जामनेर व आमदार गिरिष महाजन फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागात करण्यात येत आहे.

डॉक्टर आपल्या दारी या सामाजिक उपक्रमासाठी जळगाव जनता बँक अध्यक्ष अनिल राव यांच्या मा़र्फत ५ पीपीई किट उपलब्ध करण्यात आले आहेत. तर आमदार गिरिष महाजन यांच्या मार्फत मास्क पुरवठा उपलब्ध झाला आहे. डॉक्टर आपल्या दारी उपक्रमात भराडी,भिलखेड़ा, सवतखेड़ा ,रोटवद,जलांद्री ,सावरला , आमखेड़ा देवी ,शंकरपुरा,नागन खुर्द, वाडी किल्ला वस्ती, शहापुर या गावांमध्ये २५०० मास्क वाटप करण्यात आले. १०९७९ नागरिकापर्यत उपक्रमामार्फत वैद्यकीय सेवाकार्य पोहचले आहे. तसेच पुणे, मुंबई ,सूरत येथून आलेल्या नागरिकांची आरोग्याची तपासणी करण्यात आली व औषधी उपलब्ध देखील देण्यात आले.

ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेचा अभाव असल्याने कोविड -१९ बाबत जनजागृती व वैद्यकीय सेवा देण्यासाठी सेवाभावी वृतीतून अभाविप व जी.एम. फाउंडेशन माध्यमातून डॉक्टर आपल्या दारी उपक्रम राबविला जात आहे.

Protected Content