कोरोना योध्यांना फेस प्रोटेक्टरचे वाटप

पारोळा प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी अहोरात्र सेवा प्रदान करणार्‍या कोरोना योध्यांना येथील संताजी महाराज बहुउद्देश्यीय संस्था, कोमल मेडिकल व गोजराई क्लिनीकतर्फे फेस प्रोटेक्टरचे वाटप करण्यात आले.

कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, शहराची शांतता आणि जनतेचे सरंक्षण करण्यासाठी जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करणारे पोलिस कर्मचारी अशा योद्धांचा संताजी महाराज बहु. संस्थेचे अध्यक्ष तथा कोमल मेडीकलचे संचालक प्रविण राजाराम चौधरी व गोजराई क्लिनीकचे डॉ.मिलींद भिका चौधरी याच्यातर्फे फेस प्रोटेक्टर देण्यात आले.

पारोळा पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे साहेब, एपीआय बागुल साहेब, पीएसआय दातीर साहेब यांच्या उपस्थितीत सर्व स्टॉपला फेस प्रोटेक्टर देम्यात आले. कुटीर रुग्णालय येथे मेडीकल ऑफीसर डॉ.योगेश साळुंखे, डॉ.चेतन महाजन, डॉ.निखील बोहरा यांच्या उपस्थितीत फेस प्रोटेक्टर देण्यात आले. तसेच बालाजी संस्थानतर्फे शहरातील गरजुंना अन्न वाटप करणार्‍या न.पा.कर्मचार्‍यांना फेस प्रोटेक्टर देण्यात आले. यावेळी कर्मचारी सचिन चौधरी, रमेश किळकर, किरण कंडारे, रवि इंगळे, आकाश चौधरी, जावेद मेहतर उपस्थित होते. यावेळी प्रविण चौधरी, डॉ.मिलींद भिका चौधरी, कमलेश चौधरी, सुशांत चौधरी, चेतन वैष्णव, गणेश चौधरी, तौसीब खान आदी उपस्थित होते.

Protected Content