सावदा येथील माजी विद्यार्थ्यांकडून कोरोनाग्रस्तांसाठी ११ हजाराची मदत

सावदा प्रतिनिधी । एकीकडे कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातले आहे. तर दुसरीकडे दानशुर व्यक्तींकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत करत आहे. यापार्श्वभूमीवर शहरातील आ.ग.हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ हजार रूपयांचा धनादेश तहसीलदार यांच्याकडे सुपूर्त केला.

गेल्या दोन महिन्यांपासून संपुर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात मिळावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आर्थिक सहाय्यक निधीला आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सावदा येथील आ.ग.हायस्कुलच्या २०००ते २००५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी ११ हजार रूपयांचा धानदेश तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना सुपुर्त केला. यावेळी मुख्याधिकारी सौरभ जोशी, अजय कासार, सुरज परदेशी, करण चौधरी, चंद्रशेखर जोशी, अजय तेली आदी उपस्थित होते.

Protected Content