धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या ओवेसींवर कारवाई करा

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | “एमआयएम’ चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेचा निषेध नोंदवून येथील मराठा सेवा संघाने धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या ओवेसींवर कारवाई करण्याची मागणी आज तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

“एमआयएम’ पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी हे दोन दिवसांपूवी औरंगाबात दौऱ्यावरआले होते. त्यावेळी त्याने खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. यानंतर अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड सुरु आहे. तर काही सामाजिक संघटना आक्रमक होऊन कठोर कारवाईची मागणी करत आहे. याच धर्तीवर येथील मराठा सेवा संघ चाळीसगाव यांनी ओवेसींवर तात्काळ कारवाई करावे यासाठी तहसीलदार अमोल मोरे व शहर पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांना शनिवार, १४ रोजी सकाळी ११ वाजता निवेदन दिले. तत्पूर्वी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. सदर निवेदनात औरंगजेब स्वराज्याचे शत्रू होते. त्यांनी त्याकाळी हिंदू धर्माच्या अनेक मंदिरे पाडून नुकसान केले. असे असतानाही ओवेसी कबरीच्या दर्शनाला जाणे लज्यास्पद बाब आहे. असल्याचे नमूद करून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसीवर कठोर कारवाईची मागणी यावेळी केली आहे.

निवेदनावर मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष प्रशांत देविदास गायकवाड, अरुण पाटील, अण्णा धुमाळ, जिल्हा दूध संघाचे प्रमोद पाटील, खुशाल पाटील, संजीव पाटील, सुधीर पाटील, सुरेश चौधरी, सुनील चव्हाण, छोटू अहिरे, दीपक पाटील, योगेश राजधर, संजय चव्हाण, रयत सेना गणेश पवार, कुणाल पाटील व हेमंत पाटील आदींनी साह्य केल्या आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content