राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणुकीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार

रावेर, प्रतिनिधी| बीएलओसह मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभाग असलेल्या कर्मचा-यांनी चांगले काम केले असून लोकशाही बळकट करण्याचे काम त्यांनी केले आहे. नव मतदारांची नोंदणी करून त्यांना मतदानाचा बहुमान मिळवुन देण्याचे या कर्मचा-यांनी केले प्रतिपादन प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी केले.

 

रावेर तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेसह विविध उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी प्रांताधिकारी कैलास कडलग हे होते तर प्रमुख म्हणून तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, नायब तहसीलदार संजय तायडे,प्राचार्य बी व्ही सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.
या नंतर निवडणुकीत उत्कृष्ट कार्य करणारे मंडळ अधिकारी, तलाठी,  कोतवाल, बीएलओ,शिक्षक यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तालुक्यातील विविध शाळांमध्ये मतदार जागृतीवर आधारित रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. उत्कृष्ट नोडल अधिकारी म्हणून चतुर गाढे, नाईक कॉलेज रावेर, हेमंत बाविस्कर पटेल महाविद्यालय ऐनपूर, तलाठी, दादाराव कांबळे, शरद पाटील,अनंता खवले,मंडळ अधिकारी विठोबा पाटील, कोतवाल विकास माळी, इमरान तडवी, माधुरी महाजन, रवींद्र श्रीराम, महेश चौधरी, विनोद अटकाळे, बी एल ओ रामराव मुरकुटे, दीपक सोनार, अमिनोद्दीन जैनोद्दीन, नारायण पाटील, शांताराम  नरेकर, राजेंद्र इंगळे, मुरलीधर नेमाडे, गोकुळ चौधरी, प्रमोद पाटील, मोहन कुयटे, अशोक महाजन, इशाक अली अशफाक अली, महेंद्र पाटील, फारुकी सदरुद्दीन,दिलीप कोलते,दीपक पाटील, अक्रम खान, कपिल गावित, गोविंदा महाजन, अशोक कोळी,उमाकांत चौधरी, विश्वास बामनोदकर, अनुप पाटील, पवनकुमार महाजन, गोपाळ सपकाळे, यांचा गौरव करण्यात आला तर जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा प्रज्ञा चौधरी, चित्रकला सोहम सोनार, निबंध साक्षी धांडे, काव्य यश पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला.मतदार जागृती अभियानात व्ही एस नाईक कॉलेज रावेर, सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालय ऐनपूर ,श्री स्वामी समर्थ महिला महाविद्यालय रावेर, अध्यापक विद्यालय खिरोदा या शाळांचा सहभाग उत्कृष्ट होता कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा चतुर गाढे यांनी केले शेवटी मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली.  आभार    यासिन तडवी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी  यासिन तडवी,  सचिन पाटील, संतोष पाटील, सलीम तडवी, शिवराय लोलपे,  विक्रम राठोड, सुलेमान तडवी, आदींनी परिश्रम घेतले

Protected Content