शाळेत आदीवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या मागणीसाठी आमरण उपोषण

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथे इंग्रजी शाळेत इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गात आदीवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मुनाफ जुम्मा तडवी यांनी आदीवासी प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

येथील एकात्मीक आदीवासी प्रकल्प विकास विभागाच्या दुर्लक्षित व भोंगळ कारभारामुळे या वर्षाच्या इयत्ता पहिली व दुसरीच्या आदीवासी मुला मुलींना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानास एकात्मिक कार्यालयाचे बेजबाबदार कारभारा असून एकात्मिक कार्यालयाच्या वतीने तात्काळ विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा. या मागणीसाठी आदीवासी सामाजिक कार्यकर्ते मुनाफ जुम्मा तडवी यांनी कार्यालयासमोर आज गुरुवार दि. १ सप्टेंबरपासून आपले आमरण उपोषण सुरू केले आहे. 

या संदर्भात एकात्मिक आदीवासी प्रकल्प विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, “आदीवासी प्रकल्प कार्यालया अंतर्गत या २०२२ ते २०२३ वर्षासाठी आदीवासी बांधवांच्या मुला मुलींना मोठया शिक्षण संस्थामध्ये इंग्रजी माध्यमातुन इयता १ ते २ री पासून प्रवेश दिला जातो. आदीवासी प्रकल्प कार्यालयाने या वर्षी देखील, जाहीरात देवून सर्व आदीवासी बांधवांना मुला मुलीसाठी शैक्षणिक लाभ देण्याचे जाहीर करून त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे प्रवेश फार्म देखील स्विकारले आहे.

असे असतांना या वर्षाचे विद्यार्थ्यांचे पहिले शैक्षणिक सत्र संपले दुसऱ्या शैक्षणिक सत्राची सुरुवात होणार असून तरी देखील आज पावेतो आदीवासी प्रकल्प कार्यालयामार्फत कोणत्याही शैक्षणिक हालचाली केलेल्या दिसून येत नाही. आदीवासी प्रकल्प कार्यालयाने आदीवासींच्या मुला मुलीच्या शैक्षणिक विषयाकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिक्षणापासून वंचित राहावे लागेल आणि या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर दुसऱ्या ठिकाणी प्रवेश घेण्याची मुदतदेखील राहीलेली नाही.         

आदीवासी प्रकल्प विभागाच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील येणाऱ्या सर्व आदिवासी पालकांनी आपल्याकडे पाल्यांसाठी प्रवेश मागीतले आहे. त्या सर्व पालकांच्या मुला मुलींना शाळेत प्रवेश मिळवून देत शैक्षणिक सत्रात समाविष्ठ करुन त्यांना हक्काच्या शिक्षणाचा लाभ मिळवून देण्यात एकात्मीक आदीवासी प्रकल्प विकास विभाग असमर्थ ठरल्याने आज दिनांक १ सप्टेंबर २०२२पासुन आदीवासी प्रकल्प कार्यालयासमोर आपल्या आमरण उपोषणास सुरू केले असल्याचे मुनाफ जुम्मा तडवी यांनी निवेदनात म्हटले आहे.

उपोषणाच्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी भेट देवून उपोषणकर्त मुनाफ तडवी यांना ‘शासन पातळीवर निर्णय न झाल्याने हा विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रलंबीत असून शासन निर्णय झाल्यावर आपण विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रीया सुरू करू.’ असे आश्वासन देत ‘आपण आपले उपोषण मागे घ्यावे.’ असे आवाहन केले. ‘परंतू जोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आपले आमरण उपोषण सुरू राहणार असल्या’चे मुनाफ जुम्मा तडवी यांनी सांगीतले.

Protected Content