अधिग्रहित जमिनीचा मोबदला न मिळाल्यास शेळगाव बॅरेजचे काम बंद करण्याचा इशारा

 

जळगाव, प्रतिनिधी । कडगाव, तिघ्रे, साकेगाव या शिवारातील शेतकरी यांच्या जमिनी शासनाने शेळगाव बॅरेज प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या आहेत. मात्र, अधिग्रहण संस्था तापी तापी पाटबंधारे विभाग यांनी या जमिनीचा मोबदला जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा असतांना शेतकऱ्यांना महसूल विभागाने अद्यापही मोबदला दिलेला नसल्याने सर्व शेतकरी सोमवार 22 फेब्रुवारी  शेळगाव बॅरेजचे काम बंद व रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी  जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. 

शेळगाव बॅरेज प्रकल्पासाठी मागील वीस वर्षापासून जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. शासनाने नवीन जमीन अधिग्रहण कायदा 2013 प्रमाणे  सर्व शेतकरी यांच्या जमिनी अधिग्रहण केलेले आहेत. मागील दोन वर्षापूर्वी या जमिनीचा निवाडा तात्कालीन प्रांत दीपमाला चौरे यांनी केला होता. विशेष म्हणजे अधिग्रहण संस्था तापी तापी पाटबंधारे विभाग यांनी या जमिनीचा मोबदला जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा केलेला आहे. परंतु, कुठलेही संयुक्तिक कारण नसताना महसूल अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांचा मोबदला रक्कम अजून पर्यंत दिलेला नाही. आर्थिक अडचणींमुळे बरेच शेतकरी आजाराने तसेच कोरोना सारख्या  गंभीर आजाराने असे एकूण ३० शेतकरी मृत्युमुखी पडले. परंतु एकाही अधिकारी सांत्वनासाठी आलेला नाही.  शेत जमीन अधिग्रहित झाल्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तशी मशागत करता येत नाही. तसेच शेतामध्ये डेव्हलपमेंट करणे अशक्य झाले आहे. यामुळे गरीब शेतकऱ्याचे उत्पन्न बंद झालेले आहे . तसेच शेतकऱ्यांची मुलं व मुली लग्नाच्या वयाचे आहेत त्यांना उत्पन्न नाही तसेच नुकसानभरपाई देत नाही म्हणून त्यांची लग्न थांबलेली आहेत 

मागील पंधरवड्यात आमचे वकील महेंद्र सोमा चौधरी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी यांच्या दालनात शेतकऱ्यांच्या संवेदना मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रांत त्यांना लवकरात लवकर निवाड्याचा रकमा शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना केल्या. परंतु अजूनपर्यंत सदर शेतकऱ्यांना कलम 37 प्रमाणे पैसे घेण्यासाठीचे नोटिसी मिळाल्या नाहीत. यावरून असे दिसते की प्रशासन  शेतकरी व त्यांचे वकील यांचे कार्य करण्यास तयार नाही म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन निवेदनाद्वारे सर्व शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की, 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काम बंद आंदोलन करतील व याच वेळी यावल, शेळगाव रस्ता तसेच यावल भुसावळ रस्ता येथे रास्ता रोको आंदोलन करतील, लवकरात लवकर कडगाव तिघ्रे येथील जमीन अधिग्रहण शेतकऱ्यांचा मोबदला अदा करावा तसे न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

 

Protected Content