शिवजयंती साजरी करणे गुन्हा असेल तर लाख गुन्हे माझ्यावर नोंदवा – आमदार मंगेश चव्हाण

 

चाळीसगाव, प्रतिनिधी   शंभर जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याचे निर्देशन दिलेले असताना दिडशेच्या वरती जणांना सोबत घेऊन मिरवणुक काढली म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह दिडशे जणांवर आज शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मात्र शिवजयंती साजरी करणे गुन्हा असेल तर असे लाख गुन्हे अंगावर घ्यायला मी तयार असल्याचे   आव्हान आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले.  

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिवजयंती शंभर जणांच्या उपस्थितीत साजरी करण्याचे निर्देशन जिल्हाधिकाऱ्यांनी घातले होते.  मात्र शिवजयंतीच्या दिवशी दि. १९ फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहरातील रेल्वे स्थानक चौक ते सिग्नल चौक दरम्यान आमदार मंगेश चव्हाण सह दिडशेच्यावर कार्यकर्त्यांनी मिरवणुक काढली. म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह दिडशे जणांवर शहर पोलिस ठाण्यात आज गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यावर आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादीने परिवरसंवाद यात्रा काढली. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. तसेच काँग्रेसचे नाना पटोले यांच्या पदग्रहण सोहळा यासाठी हजारोंची गर्दी केली गेली. अशावेळी कोरोना होत नाही. मात्र शिवजयंतीसाठी एकत्र आल्यानेच कोरोना पसरतो का? असा टोला त्यांनी लगावला आहे. दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणूक येताच. शिवप्रेमींनी काढलेल्या मिरवणुकीत सहभागी होत त्यांचा उत्साह वाढविला. मात्र या मिरवणुकीला अडविण्याचे पाप सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी केले असल्याची संतप्त प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली. सिग्नल चौकात पोलिसांनी मिरवणूक अडविल्यानंतर मोठी संतापाची लाट शिवभक्तांमध्ये निर्माण झाली होती. शिवभक्त व पोलिसांमध्ये वाद निर्माण होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी उपस्थित सर्व शिवप्रेमींची समजूत घालत त्यांना मिरवणूक थांबविण्याची विनंती आ. मंगेश चव्हाण यांनी केल्याचे आपल्या प्रतिक्रियांद्वारे केले आहे. मात्र या सरकारने जो दुजाभाव शिवजयंतीबाबत केला आहे. ते शिवप्रेमी कधीच विसरणार नाही असा इशारा  आ. मंगेश चव्हाण यांनी दिला. 

Protected Content