यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अल्पयवीन मुलीला तिच्या परिवारासमोर दुचाकीवर बसवून फूस लावून पळवून नेणाऱ्या तरूणाविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय मुलगी ही आपल्या परिवारासह वस्तव्याला आहे. दरम्यान, तिचे गावातील रोनक राजू तडवी याच्यासोबत प्रेमसंबंध होते. ही बाब पिडीत मुलीच्या नातेवाईकांना समजल्यानंतर नंतर रोनक तडवीच्या नातेवाईकांना बोलावून मुलीच्या मागे लागल्याचे समजावून सांगितले होते. दरम्यान, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता अल्पवयीन मुलीचे वडील हे रिक्षा चालविण्यासाठी गेले. त्यावेळी मुलगी व तिची आई व तिचा भाऊ घरी होते. त्यावेळी रोनक तडवी हा दुचाकी घेवून मुलीच्या घरी आला. तिला फूस लावून तिच्या आई व भावासमोरून पळवून नेले. यावेळी तिच्या आई व भावाने तिला थांबण्यास सांगितले परंतू तोपर्यंत दोघे दुचाकीवरून पसार झाले. पिडीत मुलीच्या आईने यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रोनक राजू तडवी यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पेालीस कर्मचारी करीत आहे.