Home क्राईम भुसाळात वडापाव विक्री करणाऱ्या महिलेला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

भुसाळात वडापाव विक्री करणाऱ्या महिलेला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

0
30

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील जामनेर रोड परिसरात वडापाव विक्रेत्या एका ५५ वर्षीय महिलेला दारूच्या नशेत शिवीगाळ करून दुकानाचे नुकसान करणाऱ्या तरूणावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, इंदूबाई रामधन कोळी (वय-५५) रा. सिंधी कॉलनी, भुसावळ ह्या कुटुंबियासह वास्तव्याला आहेत. शहरातील एसबीआय बँकेसमोर श्रीकृष्ण वडापावचे दुकान चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवार १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास महिला दुकानावर असतांना संशयित आरोपी चेतन पोपट खडसे उर्फ गुल्ल्या रा. पंचवतटी मंडळाजवळ, हनुमान नगर भुसावळ हा दारूच्या नशेत दुकानावर येवून काहीही कारण नसतांना महिला दुकानदाराला शिवगीळा करून दहशत केली. यात वडापाव तळण्यासाठी लागणारे तेल आणि इतर वस्तू फेकून नासधूस केली. तर महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी महिलेने भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी साडेसहा वाजता भुसावळ बाजार पेठ पोलीसात संशयित आरोपी चेतन पोपट खडसे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमाकांत पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound