यावल कॉंग्रेसचे मोदी सरकारविरोधात उपोषण

 

 यावल  : प्रतिनिधी  । केन्द्रातील भाजप सरकारने  बहुमताच्या जोरावर मंजुर केलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे तात्काळ रद्द करून वाढत्या  महागाईवर अंकुश लावा या मागणीसाठी आज तहसील कार्यालयासमोर  यावल काँग्रेसच्या कार्यकर्ते  व  पदाधिकाऱ्यांनी   एक दिवसीय उपोषण केले

 

कॉग्रेसचे यावल तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद गटाचे नेते प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अन्नदाता व कामगार यांना देशोधडीला लावणारे काळे कायदे रद्द करावे या मागणीसाठी दिल्लीच्या सिमेवर शंभर दिवसापासुन आंदोलन सुरू आहे  या देशव्यापी आंदोलनात आजपर्यंत सुमारे ३००हुन अधिक शेतकरी बांधवांचा मृत्यु झाला  आहे   हे काळे कायदे शेती व्यवसाय व शेतकऱ्यांना पुर्णपणे उद्धवस्त करणारे आहेत . या काळ्या कायद्याच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना बडया भांडवलदारांचे गुलाम बनविण्याचा सरकारचा डाव आहे .

 

कॉंग्रेसच्या अध्यक्षा खा . श्रीमती सोनिया गांधी व खा . राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनास  पाठींबा दिला , देशातील ६oलाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देवुन काळे कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे . असे असतांनाही केन्द्रातील भाजपा सरकारला जाग आलेली नाही . दुसरीकडे पेट्रॉल , डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढवुन केन्द्र शासना दिवसाढवळ्या लोकांच्या खिशावर दरोडा टाकत  आहे  केन्द्राच्या कृषी बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे . या सर्व केन्द्र शासनाच्या भोंगळ शेतकरीविरोधी कारभारामुळे देश देशोधडीला  लागेल

 

या गोंधळलेल्या दिशाहीन शासनाविरूद्ध काँग्रेसने यावल तहसील कार्यालयासमोर तालुकाध्यक्ष प्रभाकर  सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार रमेश  चौधरी , जिल्हा नियोजन समितीचे  सदस्य व पंचायत समिती गटनेते शेखर  पाटील, कृउबाचे संचालक  नितिन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा . मुकेश येवले , पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी , खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरूड, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील , काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान  , नगरसेवक गुलाम रसुल  , नगरसेवक असलम शेख  , कौग्रेसशहराध्यक्ष कदीर खान , नावरे येथील सरपंच समाधान पाटील , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष करीम मन्यार , हाजी ताहेर शेख , राष्ट्रवादीचे निवृत्ती धांडे , अनिल जंजाळे , विक्की पाटील आदींनी या उपोषणात आपला सहभाग नोंदवला .उपोषणाच्या ठीकाणी प्रभारी तहसीलदार रवीन्द्र पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांनी भेट देवुन उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकुन घेतले .

Protected Content