छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल व लसीकरण सेंटरची महापौर, उपमहापौर यांच्याकडून पाहणी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल आणि कोवीड लसीकरण केंद्राची आज महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी भेट देवून पाहणी केली.

यावेळी शहरात लसीकरण वाढवण्यासाठी शहरात पिंप्राळामधील असलेली पडकी शाळा दुरुस्त करून तेथे लसिकरणाबाबत जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.  यासाठी पूर्णवेळ वीजपुरवठा, पाणीपुरवठा, जागा स्वच्छता आणि व्यवस्थित ठेवणे यासाठी पूर्णवेळ स्वच्छता कर्मचारी देणे, पिण्याचे पाणी मिळणे आणि आरओचे पाणी उपलब्ध करून देणे. याबाबत आणि निमखेडी परिसर हा खूप दूर असल्याने दादावाडी परिसरात हेल्थ पोस्ट यासाठी ३-५ खोल्या बांधून मिळणे आणि रुग्ण लासिकरणासाठी आल्यावर त्यांचे तापमान मोजणे त्यांना निर्जंतुककरण करणे याबाबत महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सूचना केल्यात. यावेळी नगरसेवक किशोर बाविस्कर, कुंदन काळे, उमेश सोनवणे डॉ.मनीषा उगले, कार्यालय अधीक्षक भट, सिस्टर मारिया आणि अधिकारी उपस्थित होते.

Protected Content