लॉकडाऊनचे उल्लंघन: कंपनीत एकत्र जेवण करणाऱ्या १४ जणांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात ५ जणांपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई असतांना एमआयडीसीतील एका कंपनीत रात्री १४ जणांनी एकत्र येवून जेवनाचा कार्यक्रम केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यासह राज्यात याचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी तीन मेपर्यंत लावून करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढलेले आहेत. दरम्यान लॉकडाऊन काळात ५ पेक्षा जास्त जणांचे गर्दी व्हायला नको असे आदेश असताना एमआयडीसी परिसरातील सेक्टर एम-७२ मध्ये कंपनीत एकापेक्षा अधिक जण जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ दखल घेत एमआयडीसीतील लिंक केअर या या कंपनीत जाऊन पाहणी केली असता रात्री ९ वाजेच्या सुमारास कंपनीच्या गच्चीवर एकूण १४ व्यक्ती एकत्र जेवण करतांना आढळून आले.

यांच्यावर केली कारवाई
चेतन वासुदेव पाटील (वय-३४) रा. कमल लॉन, रसस्वती नगर, कैलास वना कोळी (वय-२७), सुरेश अर्जुन सोनवणे (वय-२२), जयेश समाधान कोळी (वय-२२), भाईदास दौलत ठाकूर (वय-२७), सर्व रा. आसोदा रोड, दिनकर नगर, अनिल श्रीरामदास चव्हाण (वय-२९) सिकंदरपुर उत्तरप्रदेश, सागर दिलीप बारी (वय-२१) रा. गोपाळपुरा विठ्ठल पेठ, रोहिदास दौलत ठाकूर (वय-३०), हेमंत अरुण ठाकूर (वय-३०), किसन अरुण ठाकूर (वय-२६) रा. दिनकर नगर, कैलास राजाराम नावकर (वय-४९), रा. रामेश्वर कॉलनी, केशव गणेश सोनवणे (वय-३१) रा. भवानी नगर नशिराबाद, सागर किसन कुंभार (वय-२०) रा.भवानी नगर नशिराबाद, पंकजसिंग रामसिंग ठाकूर वय-४० रा. दत्त मंदिराजवळ रामेश्वर कॉलनी असे नावे आहेत. १४ जणांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादवि कलम 188, 269 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
प्रभारी पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल मोरे, पोउनि संदीप पाटील, स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, विजय नेरकर, राजेंद्र राजपूत, सतीश गरजे, गोविंदा पाटील, मुदस्सर काझी, हेमंत पाटील, संदीप पाटील, सचिन पाटील, योगेश पाटील यांनी कारवाई केली.

Protected Content