जळगावच्या दोन पोलीसांना मालेगावात ‘कोरोना’ची लागण

जळगाव प्रतिनिधी । मालेगाव येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. परिस्थितीशी सामना करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून ११० पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले आहे. यातील ४ कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. जळगाव तालुक्यातील कानळदा आणि भडगाव तालुक्यातील मुळे रहिवाशी व मालेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी आहे. असे जिल्ह्यातील दोन्हा पोलीसांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

संपर्कातील कर्मचार्‍याने घेतले स्वॅब
मालेगावात कोरोना बाधितांची संख्या अधिक असल्याने मृतांचाही आकडा मोठा आहे. जळगाव पोलीस दलातून 110 कर्मचारी बंदोबस्तासाठी गेले आहेत. यात संबंधित कर्मचार्‍याचाही समावेश आहे. कानळदा येथील रहिवासी पोलीस कर्मचारी हा यावल पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याचा अहवाल बुधवारी पॉझिटीव्ह आला आहे. बुधवारी रात्री या कर्मचार्‍याला सरकारी कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कात असलेल्या सर्व कर्मचार्‍यांचेही स्वॅब घेण्यात आलेले आहेत. या कर्मचार्‍याने पारोळा तालुक्यील हनुमंतखेडा येथे मुक्कमा केल्याची माहिती समोर आली असून त्यानुसार हनुमंतखेडा सील करण्यात आले आहे.

भडगाव तालुक्यातील नालबंदी येथील रहिवासी पोलीस कर्मचारी हा मालेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. यादरम्यानच्या काळात तो पारोळा तालुक्यातील जोगलखेडा येथील त्याच्या सासरवाडीला गेला होता. या दरम्यानच्या त्याच्या संपर्कातील २० नातेवाईकांना जळगावला हलविण्यात आले आहे तर व या नातेवाईकांच्या संपर्कातील ३४ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Protected Content