जळगावात वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांचा विनयभंग

vinay bhang

जळगाव प्रतिनिधी ।जळगावात दोन वेगवेगळ्या परीसरात राहणाऱ्या दोन महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेतील 22 वर्षी महिला पती, सासु, सासरे राहतात. बचत गटाचे पैसे घेण्यासाठी गल्लीतील दोन महिलांसोबत कॉलनीतील जे.के.पानटपरी जवळ संशयित आरोपी गिरीष कैलास पाटील याने काहीही कारण नसतांना विवाहिच्या गलावर हात फिरवून लज्जा उत्पन्ना होईल असे कृत्य करून शिवीगाळ केली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेतील 30 वर्षी महिला ही कुटुंबासह राहतात. त्यांच्या शेजारी राहणारा संशयित आरोपी रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे याने 26 रोजी सायंकाळी 6 ते 6.30 वाजेच्या दरम्यान अश्लिल शिवीगाळ करून उजवा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला व चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकास अटक
गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे करीत असून आरोपी रितेश उर्फ चीच्या यास गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री सतीश गरजे, हेमंत कळसकर, सचिन मुंडे यांनी अटक केली. दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी सुरत येथे पसार झाला आहे.

Protected Content