यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चोपडा-यावल मार्गावरील गिरडगावजवळ १० मार्च रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास महसुल पथकाने केलेल्या धडक मोहिमेत वाळूची वाहतूक करणारा ट्रक पकडून दंडात्मक कारवाई केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, यावल चोपडा मार्गावर वाळू तस्करी करणाऱ्यांच्या मागावर असलेल्या तथा तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळु माफीयाच्या विरूद्ध सुरू केलेल्या कारवाईच्या नायब तहसीलदार आर.डी.पाटील, बामणोदचे मंडळ अधिकारी एम. पी. देवरे, अंजाळे येथील तलाठी शरद सुर्यवंशी, अकलुद तलाठी अतुल बडगुजर, चिखली तलाठी सी. डी. वानखेडे आणि पोलीस कर्मचारी जगन पाटील यांच्या पथकाने आज १० मार्च रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास किनगावकडून यावलकडे येणाऱ्या मार्गावर चौधरी तोलकाट्या जवळ डंपर क्रमांक (एमएच ४० वाय ५१९) हे वाहनातुन वाळुची वाहतुक करणारे डंपर बेवारस स्थितीत मिळून आला. डंपरमध्ये वाळु असल्याचे निष्पन्न झाल्याने कारवाई करीत डंपरला यावल पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे. दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसील सुत्रांकडुन माहीती मिळाली आहे. दरम्यान महसुलच्या पथकाने तहसीलदार महेरा पवार, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, आर.डी. पाटील यांनी ही कारवाई केली आहे.