जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील म्हसावद गावात धुळे ते शेगाव श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी पायी वारीचे बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आगमन झाले. यावेळी म्हसावद येथील गावकऱ्यांनी पालखीचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. त्यानंतर गावातूल पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे ते शेगाव येथे जाणारी श्री संत गजानन महाराज याच्या पालखी पायी वारी ही गेल्या २५ वर्षांपासून अखंडीत पणे काढण्यात येत आहे. यावर्षी देखील धुळे ते शेगाव अशी पायी वारी काढण्यात आली. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे या पायी वारीचे बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी आगमन झाले. यावेळी म्हसावद येथील गावकऱ्यांसह मान्यवरांनी पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी म्हसावद गावातील लमांजन रोडवरील श्री संत गजानन महाराज मंदीर परिसरात पालखीने विसावा घेतला. यावेळी गावातील भाविकांच्या सहकार्याने आरती सेवा व महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत बापू महाजन, घनश्याम पोरवाल, प्रभाकर मोरे, दुर्गेश गुजरे, सुरेश पाटील, रविंद्र कोळी, श्याम वाणी, सुरेश भोई, नितीन पाटील, पत्रकार दिपक महाजन यांच्यासह जय गजानन ग्रुपचे सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.