धुळ्यात शिवजयंती दरम्यान झालेल्या दगडफेकीचा जाहीर निषेध

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धुळे शहरात १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या मिरवणूकीत काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील समाजकंटाकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन पाचोरा येथील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने पाचोरा तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आले.

धुळे शहरात १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मिरवणूक काढुन उत्साहात साजरी करण्यात येत असतांनाच शहरातील चाळीसगाव रोडवरील सुफी दवाखान्या जवळ काही समाजकंटकांनी मिरवणुकीत सहभागी असलेल्या लहान बालक, माता, भगिणी यांचेवर अमानुषपणे दगडफेक केल्याने या दगडफेकीत अनेक बालके, महिला व नागरिक जखमी झाले आहेत. अशा समाजकंटकांचा पाचोरा येथील विश्व हिंदु परिषद बजरंग दलातर्फे जाहिर निषेध करत या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांना कठोर शासन करावे. अन्यथा विश्व हिंदु परिषद बजरंग दलातर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल. अशा आषयाचे निवेदन आज २२ फेब्रुवारी रोजी पाचोरा विश्व हिंदु परिषद बजरंग दलातर्फे तहसिलदार कैलास चावडे व पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे यांना देण्यात आले. निवेदन देते प्रसंगी बजरंग दलाचे जिल्हा सह संघटक अतुल पाटील, प्रखंड मंत्री योगेश सोनार, सह प्रखंड मंत्री दिपक राजपुत, शहर मंत्री योगेश पाटील, गोरक्षक अभिषेक पाटील, संयोजक बंटी पाटील, सदस्य सचिन पाटील, रघुनाथ पाटील, दिनेश लोणारी, सुनिल पाटील, बंटी भोई, चेतन भोई, नथ्थु पुजारी, प्रितेश पाटील उपस्थित होते.

Protected Content