म्हशीचं हंबरणं चालेल पण अमृता फडणवीसांचं गाणं नको !

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । अमृता फडणवीस यांचे भाऊबीजेला एक गाणे रिलीज झाले आहे. अमृता यांनी ते गायले आहे. परंतु, या गाण्यावर प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर यांनी टीका केली असून म्हशीचं   हंबरणं चालेल पण अमृता फडणवीसांचं गाणं नको असं म्हटलं आहे !

अमृता यांच्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महेश टिळेकर यांनीदेखील त्यांच्या गाण्यावर टीका केली आहे . महेश म्हणाले, ‘एकवेळ गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही.’ अमृत फडणवीस यांना खरंच गाता येते का? असा सवालही त्यांनी केला.
टिळेकरांनी अशी टीका करून म्हशींचाच अपमान केला आहे अशा पारखड प्रतिक्रियांमधून अमृता फडणवीसांची जोरदार खिल्ली उडवली जात आहे

चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही , हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते ,लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्र्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे? गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही. आपल्याकडे जुनी म्हण आहे ” आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून? केवळ ह्या अश्या गायिकेला प्रोमोट करण्यासाठी तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी सिरीज सारखी ,नेहमीच बिझिनेसला प्राधान्य देणारी कंपनी का पैसा खर्च करत आहे,? त्यामागे काय लागेबांधे आहेत ? हे एक न सुटणारे कोडे आहे आणि जर ह्या गायिके कडे स्वतःचा अतिरिक्त खूपच पैसा असेल तर तिने एखादं संगीत विद्यालय सुरू करून नवोदित गायकांना चांगल्या संगीत शिक्षकांचे मार्गदर्शन होईल यासाठी स्वतः न गाता फक्त संगीत सेवा करावी.

पण काहीही म्हणा लता मंगेशकर यांनी गायलेल्या ” आज अमृताचा दीनु..या ओळीतील अमृता हा शब्द लता दीदींच्या मुखातून ऐकायला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवितून वाचायलाच योग्य वाटतो.इतरांनी फक्त त्या अमृता नावाची किमान लाज राहील याचा तरी प्रयत्न करावी . टिळेकर यांच्या या जिव्हारी लागू शकणाऱ्या थेट टीकेमुळे संगीत विश्वातही चर्चा होते आहे

Protected Content