रथ चौकात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रथ चौकात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

शनीपेठ पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील रथचौकात मुनेश सुपडू बारी (वय-४६) रा. बालाजी पेठ यांचे चहाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते चहाचे दुकान उघडण्यासाठी गेले. त्यांना एक अनोळखी व्यक्ती हालचाल न करता पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी शनीपेठ पोलीसांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून अंदाजे ५० ते ५५ वर्षीय व्यक्तीस जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मुनेश बारी यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येणार आहे. पुढील तपास हे.कॉ. रघूनाथ महाजन करीत आहे. सदरील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन शनीपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी केले आहे.

Protected Content