…म्हणून महाआघाडीचे ‘मल्टीस्टारर’ सरकार ! : अशोक चव्हाण

ashok photo

नांदेड प्रतिनिधी । सध्या ‘मल्टीस्टारर’ चित्रपटांचा जमाना असल्याने राज्यातही महाआघाडीचे तीन पक्षांचे सरकार कार्यरत असल्याचे प्रतिपादन ना. अशोक चव्हाण यांनी केले. ते येथील कार्यक्रमात बोलत होते.

महाआघाडीच्या सरकारबाबत सार्वजनीक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांना विचारणा करण्यात आल्यावर ते म्हणाले की, आमचं क्षेत्र असो वा सिनेमा, नाट्य क्षेत्र सारखचं असतं. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे. आम्ही तीन पक्ष एकत्र येऊ असं वाटत नव्हतं. पण आम्ही एकत्र आलो, हल्ली मल्टिस्टारचा जमाना आहे, तीन हिरो पाहिजे. त्यामुळे आमचं सरकार आलं तीन पक्षाचं तीन विचारांचे सरकार चालणार कसं? हा प्रश्‍न होताच पण घटनेच्या आधारावर आपलं सरकार चाललं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आम्हाला दोन पक्षाचं सरकार चालवण्याचा अनुभव आहे त्यात आता तिसरा शिवसेना पक्ष सहभागी झाला असं ते म्हणाले.

ना. अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, उध्दव ठाकरे घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार, अशी भूमिका घेतली त्यामुळे हे सरकार स्थापन झालं असं अशोक चव्हाणांनी सांगितले. महाआघाडीचे सरकार सर्वसामान्यांच्या हिताची भूमिका घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Protected Content