मुंबई (वृत्तसंस्था) सरसंघचालक मोहन भागवत यांनी घटस्फोटावर केलेल्या वक्तव्यावर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने कोणता समजूतदार माणूस असे वक्तव्य करतो?. मागासलेले आणि मूर्ख वक्तव्य असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियातून दिली आहे.
सध्या समाजात घटस्फोटाची प्रकरणं वाढत चालली आहेत. संपन्न आणि सुशिक्षित कुटुंबांमध्ये घटस्फोटाची प्रकरणं जास्त आहेत. कारण शिक्षण आणि संपन्नतेमुळे लोकांमध्ये अहंकार आणि उद्धटपणा येतो. यामुळे कुटुंबं तुटतात, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले होते. त्यावर अनेक स्थरातून निंदा केली जात आहे. यावर सोनमनेही ट्वीट करून आपले मत व्यक्त केले आहे.