नवी दिल्ली : वृत्तसंस्था । शेतकरी आंदोलन चिघळणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे. कारण शेतकऱ्यांनी आज मोदी सरकारचा प्रस्ताव फेटाळला आहे.
एवढंच नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. १२ डिसेंबरला राजस्थान हायवे आणि दिल्ली बॉर्डर जाम करणार. १४ डिसेंबर रोजी एक दिवसाचं उपोषण केलं जाणार आहे असं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. तसंच त्याच दिवशी धरणे आंदोलनही संपूर्ण देशभरात केलं जाणार आहे. जोपर्यंत मोदी सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार आहे असंही शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं.