Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात ३६ रूग्ण बाधित आढळले; आठ तालुक्याचा अहवाल निरंक

कोरोना : जिल्ह्यात ३६ रूग्ण बाधित आढळले; आठ तालुक्याचा अहवाल निरंक


जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसा आज जिल्ह्यातून ३६ कोरोना बाधित आढळून आले आहे. तर आज ४९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आठ तालुके कोरोनामुक्त झाले आहेत.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-११, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-५, अमळनेर-३, चोपडा-१, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-११, बोदवड-० असे एकुण ३६ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहे.

आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५४ हजार ९०८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. त्यापैकी ४१३ रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. तर जिल्ह्यात एकुण ५३ हजार १८८ रूग्णांची कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहरातील एका कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड सेंटरच्या वतीने कळविण्यात आले आहे.


Protected Content

Play sound