नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकू नर्मदाबेन मोदी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्या अहमदाबादच्या एका रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्या ८० वर्षांच्या होत्या. त्या न्यू रानिप या भागात आपल्या परिवारासोबत राहत होत्या.
नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणतात की, नर्मदाबेन या दहा दिवसांपासून कोरोनाने आजारी होत्या आणि रुग्णालयात उपचार घेत होत्या. नरेंद्र मोदी यांचे काका आणि नर्मदाबेन यांचे पती जगजीवनदास यांचं पूर्वीच निधन झालं आहे. नर्मदाबेन या त्यांच्या मुलांसोबत राहत होत्या.