मोतीराम पाटील यांचे निधन

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील योगेश्‍वर नगरातील रहिवासी मोतीराम झडू पाटील (वय ८५) यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मोतीराम झडू पाटील हे मूळचे सुनसगाव (ता. भुसावळ) येथील रहिवासी होते. मध्यप्रदेशातील आमला येथे रेल्वेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते जळगावात स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते तिकिट निरिक्षक प्रमोद पाटील यांचे वडील होत.

Protected Content