रामानंदनगर परिसरातून लोखंडी आसारींची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रामानंदनगर परिसरातील सह्याद्रीशिखर नावाच्या अपार्टमेंटमधून दोन तरुणांनी ५० किलो लोखंडी आसारी तसेच आसारीचे तुकडे असा ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याप्रकरणी बुधवार २० जुलै रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरात सह्याद्री शिखर अपार्टमेंट असून याठिकणी लोखंडी आसारीसह वस्तूचा व्यवसाय आहे. या ठिकाणाहून ५० किलो लोखंडी आसारी व लोखंडी आसारीचे तुकडे चोरुन नेल्याचा प्रकार बुधवारी दुपारी ४ वाजता समोर आला. चोरीची खात्री झाल्यावर येथील सुपरवायझर हरिषचंद्र कृष्णराव देशमुख वय ४० यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली आहे. समता नगर येथील शाम सोपान कळसकर वय २५ व विकास नाना सोनवणे वय २४ या दोन जणांनी ही चोरी केल्याचे तक्रारीत नमूद असून त्यानुसार बुधवारी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील चौधरी हे करीत आहेत

Protected Content