धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धरणगाव चोपडा रस्त्यावर रोटवद गावाजवळ अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करताना धरणगाव पोलिसांनी कारवाई करत सुमारे 31 लाख 54 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि गुटखा हस्तगत केला आहे या कारवाईत एकाला धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांना गोपनीय माहिती मिळाली की. चोपडा रोडवरील रोडवद गावाजवळून बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार धरणगाव पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. धरणगाव पोलिसांनी गुरुवारी 22 डिसेंबर रोजी तातडीने कारवाई करत 407 ट्रक जमा करून एकूण तीस लाख 54 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल यामध्ये गुटखा व वाहन (एम एच 19 सीजी ५८) जप्त केले आहे या कारवाईत वाहन चालक राधेश्याम संजय सूर्यवंशी रा. पिंपरकोठा ता. एरंडोल याला अटक केली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.