हाथरस येथील खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवा-शिवसेना महिला आघाडी

धरणगाव । हाथरस येतील दलीत मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या प्रकरणाचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात आज निवेदन देण्यात आले.

शिवसेना महिला आघाडीतर्फे आज हाथरस प्रकरणी पोलीस व महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यात नमूद केले आहे की, हाथरस येथील दलित परीवार तील मुलींवर उच्च जातीचा काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार केला ते गावगुंड फक्त बलात्कार करून शांत बसले नाही तर उलट तिच्या हातापायाची हाडे तोडली जीभ कापली व गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आज ती हयात नसली तरी तिने मृत्यू आधी पोलीसांना दिलेल्या जबानीत सर्व कथन केले. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्या गुंड प्रवृत्तीच्या युवकांना अटक केली आहे.

पिडीत मयत तरूणी ही दलित परीवारातील असून फक्त१९ वर्ष वयाची होती. ती आपल्या शेतात गुरांना चारा देण्यासाठी जात असताना तिचा पाळतीवर असलेल्या जातीच्या गुंड नि कायद्याची भीती न बाळगता हे कृत्य केल. उत्तर प्रदेशातील योगी सरकार तसेच केंद्र सरकार या बाबत गंभीर नसल्याचा आरोप यात करण्यात आला. सरकारने या प्रकरणाची जलद गतीने चौकशी करून दोषींना फासावर लटकवावे अशी मागणी व्यक्त करण्यात आली आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील यांनी प्रशासनाला सादर केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष उषा वाघ, धरणगाव उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन, नगरसेविका अंजली भानुदास विसावे, सुनिता लिडांयत, सुनंदा विसावे, वैशाली पवार, गंगा वाघरे, उषा वाघरे, गोरी वाघरे, आरती चंडाले, रेखा वाघरे, सुनीता चौधरी, भारतीताई चौधरी, नेहा प्रकाश पाटील आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Protected Content