उद्योग निरीक्षक अधिकारी प्रियंका पाटील यांचा नागरी सत्कार

चाळीसगाव –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिद्द आणि चिकाटीने सातत्याने अभ्यास करून अथक प्रयत्नातून  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उद्योग निरीक्षक अधिकारी म्हणून घवघवीत यश संपादन करून चाळीसगाव तालुक्याचे नाव महाराष्ट्रात उंचावले असल्याचे गौरवोद्गार रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी  तालुक्यातील हातले येथे प्रियांका पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना काढले.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रियांका पाटील यांनी उद्योग निरीक्षक म्हणून यश संपादन केल्याबद्दल तालुक्यातील  हातले  ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी गणेश पवार बोलत होते.  पुढे बोलताना गणेश पवार म्हणाले की,  आई वडीलानी मुलांवर चांगले संस्कार करून त्यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिल्यास अत्यंत खडतर परिस्थितीतून विद्यार्थी उच्च शिक्षण घेवून यश संपादन करु शकतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासात मेहनत घेतल्यास यश संपादन करता येते हेच प्रियंका पाटील यांनी उद्योग निरीक्षक अधिकारी होऊन सिध्द केल्याचे त्यांनी सांगितले. जि. प. सदस्य पोपटतात्या भोळे म्हणाले की, ग्रामीण भागातील  विद्यार्थी मराठी शाळेतून शिक्षण घेऊन अधिकारी होऊ शकतात हे प्रियांका पाटील या शेतकरी कुंटुंबातील विद्यार्थिनीने उद्योग निरीक्षक होऊन दाखवून दिले असे सांगत पुढे जिल्हाधिकारी या पदापर्यंत यश मिळवा या  पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी  मजरे मा .सरपंच तुकाराम पाटील , भामरे विद्यालयाचे मुख्याध्यापक ब्रिजेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते उद्योग निरीक्षक प्रियांका पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना प्रियांका पाटील यांनी सांगितले की,  मला  घडविण्यासाठी आई ,वडील,बाबा,आजी, मामा, भाऊ यांचा सिहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगत गरीब परीस्थितीतुन शिक्षण घेऊन सातत्याने अभ्यास करून मेहनत घेत  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत अधिकारी पदावर मजल मारली असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास चाभार्डी सरपंच प्रकाश पाटील, जामडी चे माजी उपसरपंच संजय पाटील, वाकडीचे सरपंच प्रकाश पाटील, वाघले चे सरपंचवाकडीचे सरपंच प्रकाश पाटील, वाघले चे सरपंच रामदास चव्हाण, तलाठी वैशाली कैकान, गौतम झाल्टे, हातले  पोलीस पाटील साहेबराव झाल्टे, वाघडू  पोलीस पाटील मनोज पाटील, रयत सेनेचे समन्वयक  पी एन पाटील, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे,  तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले ,शहर अध्यक्ष छोटू अहिरे, कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, संघटक दीपक देशमुख, विशाल सपकाळ ,  प्रकाश जगताप, चंद्रकांत बागुल, संजय पाटील, ज्ञानेश्वर सोनार, शिवाजी गवळी ,सुनील परदेशी व मेरा गाव मेरा तीर्थ चे खुशाल मराठे,तसेच प्रियंका पाटील यांचे वडील रवींद्र पाटील आई वर्षा पाटील, भाऊ अक्षय पाटील ,राहुल पाटील ,वहिनी पूजा पाटील  , मामा कैलास शिर्के ,काका सि आर पी एफ मेजर सचिन साळुंखे यांच्यासह हातले येथील ग्रा प सदस्य,ग्रामसेवक ,विद्यार्थिनी, महिला व  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केले.

Protected Content