तळवेल येथे ‘ऑनर किलींग’; पालक अटकेत

murder 0498175701938694680

भुसावळ प्रतिनिधी । समाजात बदनामी होण्याच्या भितीने तालुक्यातील तळवेल येथील एका दाम्पत्याने आपल्या पोटच्या मुलीचा गळा घोटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील तळवेल येथील एका अल्पवयीन मुलीचे दुसर्‍या जातीतल्या तरूणासोबत प्रेमसंबंध होते. पालकांना याची कुणकुण लागताच त्यांनी तिचे लग्न उरकून टाकण्याची तयारी केली. मुलीने ही बाब तरूणाला सांगितल्याने त्याने याबाबत पोलिसात तक्रार केली. या सर्व प्रकारामुळे समाजात बदनामी होईल या भितीने सुधाकर मधुकर पाटील (वय ४६) व आई नंदाबाई पाटील (वय ४०, रा.तळवेल) या दाम्पत्याने आपल्या मुलीचा गळा घोटून खून केला. शुक्रवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली असून त्या मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Protected Content