मेहरूण तलावावर तरूणावर हल्ला करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला अटक

जळगाव प्रतिनिधी । मेहरूण तलावावर वॉकींग करणाऱ्या तरूणाला अनोळखी तिघांना दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून तरूणावर चॉपर हल्ला करून मारहाण करून फरार असलेल्या तिसऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी आज ७ जानेवारी रोजी डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजता अटक केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, इंद्रजित हेमंत देशमुख (वय-२५) रा. प्लॉट नं.३०, उत्कर्ष सोसायटी, आदर्श नगर हा गावाहून आलेल्या मैत्रिणीसोबत १६ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील मेहरूण तलावाजवळ वॉकिंग करण्यासाठी गेले. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्ती अचानकपणे समोर येवून एकाने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तेव्हा माझ्याकडे पैसे नाही असे सांगितल्यावर मारहाण करण्यास सुरूवात केली. दुसऱ्याने मैत्रिणीशी झटापट सुरू केली व तिच्या हातातील २५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल बळजबरी हिसकावून घेतला. तर तिसऱ्या व्यक्तीने धारदार चॉपर काढून धाक दाखवत मारहाण केली. व इंद्रजितच्या खिश्यातील मोबाईल काढून दुचाकीने पळ काढला. याप्रकरणी इंद्रजित देशमुख याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी राहुल राजू गवळी (वय-२०) रा. गवळी वाडा, तांबापूरा याला १७ नोव्हेंबर २०२० रोजी तर दुसरा संशयित साथिदार शोएब शेख उर्फ माकोडा शेख नरूद्दीन (वय-२२) रा. टिपू सुलतान चौक, तांबापूरा याला ३० डिसेंबर रोजी अटक केली आहे. तर तिसरा संशयित शेख शकील शहा रूबाब शहा (वय-२१) रा. तांबापूरा याला एमआयडीसी पोलीसांनी सुरत येथून अटक केली. गुन्ह्यात वापरलेली मोबाईल हस्तगत करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरत येथून पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, मिलिंद सोनवणे, किशोर पाटील, सचिन पाटील यांनी अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता तिसरा संशयित आरोपी शेख शकील याला कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे. सरकारतर्फे ॲड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले.

Protected Content