अपूर्ण घरकुले असणाऱ्या लाभार्थांच्या घरापर्यंत जाऊन समस्या सोडवा– दिपाली कोतवाल

 

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील प्रलंबीत घरकुल असणाऱ्या लाभार्थांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या सोडवा त्यांना येणाऱ्या अडचणी जागेवर सोडवुन अपूर्ण घरकुले पूर्ण करा अशा सूचना गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी ग्रामसेवकांना दिल्यात.

रावेर पंचायत समितीमध्ये अपूर्ण घरकुल संदर्भात महत्वाची बैठक पार पडली. यावेळी गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी महाआवास अभियान जलजीवन मिशन,१५ वित्त,१४ वित्त ग्राम पंचयात कर वसुली महारष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना संदर्भात पंचायत समितीमध्ये तालुक्यातील ग्रामसेवकांचे आढावा घेण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी डी. एस. सोनवणे, दिपक संदानशिव, शशिकांत सपकाळे, श्री जाधव आदी उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती

रावेर पंचायत समितीच्या आढावा बैठकीला ग्राम सेवक दिपक कोसोदे उध्वद चौधरी आर के चौधरी डी सी पाटील मनोहर चौधरी एम डी पाटील अनिल वराडे छाया नेमाडे विद्या धांडे अफरीन तडवी कपिला गावीत सुनील सवर्णे राहुल लोखंडे ए डी पाटील दिपक कोळी विजय पाटील दिनेश वळवी दिलीप तडवी रमेश महाजन महेंद्र पवार आदी ग्राम सेवक उपस्थित होते.

तालुक्यात ९३७ घरकुले अपूर्ण

रावेर तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेचे ३४८ रमाई घरकुल योजनेचे ४४० शबरी घरकुल योजनेचे १४९ असे एकूण ९३७ घरकुले विविध कारणामुळे अपूर्ण आहे. हे घरकुले पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी दिले आहे.

 

Protected Content