न्यूयॉर्क : वृत्तसंस्था । अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरून डोनाल्ड ट्रम्प यांना पायउतार व्हावं लागणार यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. ट्रम्प यांना आणखी एक कौटुंबिक धक्का बसण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मलेनिया ट्रम्प घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांच्यात १५ वर्षापूर्वी सुरु झालेलं नातं संपुष्टात येत आहे. दोघांच्या नात्याला तडा गेला आहे. व्हाइट हाउसमध्ये काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प वेगवेगळ्या खोल्यामध्ये वास्तव्यास आहेत. मेलेनिया ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये घटस्फोट आणि लग्नासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहेत. यात मेलेनियानं मुलगा बॅरेनचा ताबा आणि संपत्तीत अर्धा वाटा मागितला आहे. डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाउस सोडताच दोघांमध्ये घटस्फोट होऊ शकतो. मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्पच्या लग्नाला स्टेफनी वोल्कॉफन ट्रंजेक्शनल असं म्हटलेय.
डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय सहयोगी ओमारोसा मॅनिगॉल्ट न्यूमॅन यांनीही दोघांच्या नात्यात तडा गेल्याचं म्हटलेय. ओमारोसा मॅनिगॉल्ट न्यूमॅन म्हणालेत की, १५ वर्षांपासून एकत्र असणाऱ्या ट्रम्प दाम्पत्यांच्या नातं संपुष्टात आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाउसमधून बाहेर पडताच मेलेनिया घटस्फोट देईल. डोनाल्ड ट्रम्प यांचा बदला घेम्यासाठी मेलेनिया ट्रम्प सध्या रस्ता शोधत आहे.
१९९८ मध्ये मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रेमप्रकरण सुरु झालं होतं. त्यावेळी ट्रम्प यांचं वय ५२ होत तर मेलेनिया याचं वय २८ होतं. त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये फॅशन वीक सुरु होता दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर २००४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी १.५ मिलिअन डॉलरची डायमंड रिंग मेलेनियाला देत लग्नाची मागणी केली होती. २२ जानेवारी २००५ मध्ये दोघांनी लग्न केलं होतं.