भोलाणे येथे तापी काठी तीन गावठी हातभट्ट्या उद्धवस्त; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भोलाणे येथील तापी नदी काठच्या जंगलात बेकायदेशीर सुरू असलेली गावठी हातभट्टी तालुका पोलीसांनी उद्ध्वस्त केली. तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या सुचनेनुसार तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी तालुक्यातील भोलाणे गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या किनारच्या जंगलात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टी उद्धवस्त केली. ही कारवाई पोलीसांनी आज पहाटे ५.३० ते ८.३० वाजेच्या दरम्यान केली. तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत ३३ ड्रम मधील सुमारे २०० लिटरचे कच्चे व पक्के रसायन असे पोलीसांनी नष्ट केली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत पोहेकॉ साहेबराव पाटील, पोहेकॉ राजेश पाटील, बापू पाटील, पो.ना. सुधाकर शिंदे. पो.ना. सुशिर पाटील, विलास शिंदे, ज्ञानेश्वर कोळी, मनोज पाटील, पो.कॉ. धमेंद्र ठाकूर चालक अशोक महाले यांनी ही कारवाई केली आहे.

Protected Content